Maharashtra Political Crisis | "भारताचा इतिहास सांगतो..." शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेरील पोस्टर्स चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी रविवारी (दि. २) उपमुख्यमंत्री पदाची शपथ (Ajit pawar latest) घेतली. या घडमोडीमुळे राज्याच्या राजकारणासह महाविकास आघाडीत राजकीय उलथापालथ झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर पोस्टर्स लावण्यात आले आहे. त्यावर लिहिण्यात आले आहे की, ‘भारताचा इतिहास असा आहे की ज्यांनी विश्वासघात केला त्यांना कधीही माफ केले नाही’. ही पोस्टर्स सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहेत. (Maharashtra Political Crisis )
Maharashtra Political Crisis : …त्यांना कधीही माफ केले नाही

त्याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने ‘बाहुबली’ चित्रपटातील एका दृश्यावर डिझाईन केलेले पोस्टर लावले आहे, त्यामध्ये पात्र ‘कटप्पा’ ‘अमरेंद्र बाहुबली’च्या पाठीत वार करत आहे. या पोस्टरवर लिहण्यात आले आहे की,””आपल्यात लपलेल्या गद्दारांना सारा देश पाहत आहे. जनता माफ करणार नाही. अशा खोट्या मूर्खांना”. या पोस्टरवर गद्दार हॅशटॅग दिला आहे.
शरद पवार दिल्लीला रवाना
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादीच्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांनी काल मुंबईत पक्षाच्या दोन वेगवेगळ्या बैठका बोलावल्या होत्या. आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. शरद पवार हे त्यांच्या मुंबईमधील निवासस्थानावरून दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, नवी दिल्ली नगरपरिषदेने शरद पवार यांचे पोस्टर्स आणि होर्डिंग्स काढले आहेत. (Maharashtra Political Crisis)
Posters saying “In the fight of truth and lie, the entire country is with Sharad Pawar” and “India’s history is such that it has never forgiven those who have betrayed” come up outside NCP chief Sharad Pawar’s residence in Delhi.
He is arriving in Delhi today for the party’s… pic.twitter.com/pJN0WcoavG
— ANI (@ANI) July 6, 2023
Delhi | Amid NCP vs NCP crisis in Maharashtra, Rashtrawadi Vidyarthi Congress puts up a poster designed on a scene from the film ‘Baahubali – The Beginning’, showing its character ‘Kattappa’ stabbing ‘Amarendra Baahubali’ in the back. pic.twitter.com/ojq7EmXO7A
— ANI (@ANI) July 6, 2023
#WATCH | Old posters and hoardings of NCP that showed Ajit Pawar and Praful Patel on them are being removed from outside the office of the party in Delhi. A new poster with ‘Gaddaar’ (traitor) written on it is being put up there. pic.twitter.com/CjLoQmI5u9
— ANI (@ANI) July 6, 2023
हेही वाचा
- NCP crisis in Maharashtra : काकावर पुतण्या भारी; अजित पवारांकडे 33, तर शरद पवारांकडे 15 आमदारांची उपस्थिती
- राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांचा दावा, निवडणूक आयोगात याचिका दाखल
- Amol Kolhe in NCP Meet : ‘ही लढाई कर्तव्याची’; अमोल कोल्हेंकडून श्रीकृष्ण-अर्जूनाच्या संवादाचे दाखले
- Nashik : शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार! कारसुळच्या प्रशांत ताकाटे याची खडतर प्रवासातून यशाला गवसणी