आषाढी एकादशीमुळे बकरी ईदची कुर्बानी नाही | पुढारी

आषाढी एकादशीमुळे बकरी ईदची कुर्बानी नाही

बीड, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी दि. 29 जुन आला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु धर्मियांच्या भावनांचा आदर राखत बीड येथील जमैतुल कुरैश सामाजिक संघटनेच्यावतीने बकरी ईद निमित्त दिली जाणारी कुर्बानी 29 जून ऐवजी 30 जून रोजी देण्याचे निश्चित करण्यात आले. सामाजिक शांततेसाठी मुस्लीम समजाने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वांनी स्वागत केले.

बीड येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद कुरेशी यांनी दोन दिवसांपूर्वी पुढाकार घेत खाटीक समाज संघटनेची बैठक घेवून आषाढी एकादशी दिवशी मांस विक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर रविवारी सकाळी बीडमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्‍यान बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. याला सर्वांनी पाठींबा दिला असून या निर्णयाचे स्वागत केले आहे.

-हेही वाचा 

शिक्षकांचा निरोप समारंभ अनं केळी गावचे अश्रू अनावर

पिंपरी : सिंहगड एक्स्प्रेसमधील स्वतंत्र बोगीमुळे प्रवास सुखकर

पुणे-सातारा मुख्य रस्त्यासह सेवा रस्ता पाण्याखाली

Back to top button