शिक्षकांचा निरोप समारंभ अनं केळी गावचे अश्रू अनावर | पुढारी

शिक्षकांचा निरोप समारंभ अनं केळी गावचे अश्रू अनावर

औंढा नागनाथ, पुढारी वृत्‍तसेवा : जिल्हा परिषद केळी येथील श्री सिद्धेश्वर मुंडे व श्री नितीश वैरागडे या दोन शिक्षकांचा शासन नियमाप्रमाणे बदल्या झाल्या. त्या निमित्ताने शाळेत निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी सलग तेरा वर्ष सेवा करत असताना प्रत्येक कार्यक्रमातून गावकऱ्यांना प्रोत्साहित करून केले. हागणदारी मुक्त गाव, बालविवाहास विरोध, मुलींचे शिक्षण, व्यसनमुक्ती आणि सतत शाळेतील गुणवत्ता टिकवून जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न या कार्यास गावकऱ्यांनी उजाळा दिला. याप्रसंगी सर्वांचे डोळे भरून आले.

लेझीम पथक व पुष्पव्रष्टीमध्ये झालेले स्वागत सपत्नीक सत्कार व सन्मान गावकरी मंडळी , विद्यार्थी व सहकारी मित्रांचे ओले डोळे पाहून दोन्ही शिक्षकांना गहिवरून आले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुंडे सर व वैरागडे सर यांनी गावकऱ्यांना कोणताही भेदभाव न करता एकोप्याने राहण्याचे, व्यसनापासून दूर राहण्याचे व शाळेला निरंतर सहकार्य करण्याचे आवाहन केले. सर्व सहकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सर्वांनी मिळून नवीन रुजू झालेले शिक्षक दुधाटे सर यांचे स्वागत केले शेवटी निरोप देताना सर्वजण हुंदके देऊन रडू लागले.

-हेही वाचा 

पिंपरी : चालकांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना दुखापतीच्या घटना

बारामती मतदारसंघात परिवर्तन घडणार ; माजी खासदार किरीट सोमय्या यांचा विश्वास

पुणे : विनयभंगप्रकरणी 7 जण ताब्यात; तिघे फरार

Back to top button