

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील अडिच ते तीन हजार नागरिक कामानिमित्त सिंहगड एक्स्प्रेसने रेल्वेगाडीने मुंबई गाठतात; मात्र पिंपरी आणि चिंचवड स्थानकामधील प्रवाशासांठी अद्याप पर्यंत एकाच बोगीची सुविधा होती. 11 जून पासून या दोन्ही स्थानकासाठी रेल्वेकडून स्वतंत्र बोगींची व्यवस्था करण्यात आल्यामुळे करण्यात आल्याने शहरवासीयांचा सिंहगड रेल्वेगाडीतील प्रवास पूर्वीपेक्षा सुखकर झाल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
कोविड काळात पुणे-मुंबई लोहमार्गावर धावणार्या अनेक गाड्या बंद केल्या होत्या, तर काहींचे थांबे बदलले तर काहींच्या बोगी कमी करण्यात आल्या मात्र कोविड काळ संपला. तरी देखील रेल्वे प्रशासनाने काही गाड्या बंदच ठेवल्या याचा त्रास पास धारक प्रवाशांना मोठ्या प्रमाणात झाला होता. यावर उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड प्रवासी संघासह शहरातील सर्व संघटनांनी एकत्र येत रेल्वेच्या डीआरएम कार्यालयाशी संपर्क ठेवत. त्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या होत्या. अखेर पिंपरी आणि चिंचवड स्थानकांसाठी स्वतंत्र बोगीची व्यवस्था करण्यात आली. यामुळे गाडीत चढताना दररोज होत असलेली चेंगराचेंगरी वाद अखेर कमी झाले. आणि शहरवासियांचा प्रवास पूर्वीपेक्षा काही प्रमाणात सुखकर होत आहे.
प्रगती एक्स्प्रेसचा पिंपरी आणि चिंचवड या स्थानकात थांबा नाही. मात्र या एक्स्प्रेसला थांबा दिला गेला तर सिंहगड एक्स्प्रेसवरील ताण कमी होऊन, प्रवाशासांठी सोईचा निर्णय ठरणार अशी मागणी पिंपरी-चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने करण्यात येत आहे.
हेही वाचा