बीड : दोन गटात वादानंतर गोळीबार; तिघेजण जखमी | पुढारी

बीड : दोन गटात वादानंतर गोळीबार; तिघेजण जखमी

बीड; पुढारी वृत्तसेवा : बीड शहरातील नगर रोडवरील कालिका नगर भागात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन गट समोरासमोर आले. या दोन गटात झालेल्या वादादरम्यान दगडफेक झाली. यानंतर एका गटाकडून गोळीबार करण्यात आला. या सर्व प्रकारात तिघेजण जखमी झाले आहेत.

हा वाद सुरु असतांनाच पोलिस दाखल झाल्याने परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, पोलिस निरीक्षक केतन राठोड, सपोनि पाथरकर, गुरले यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा : 

Back to top button