अहमदनगर : पत्राशेड दुकानांना भीषण आग; सहा दुकाने जळून खाक

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील पारिजात चौकात पत्रा शेडच्या दुकानांना शुक्रवारी दुपारी आग लागून सहा दुकाने खाक झाली. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली. उपनगरातील पारिजात चौकातील पत्राशेडच्या दुकानांना दुपारी मोठ्या प्रमाणात आग लागली. त्या आगीत तब्बल सहा दुकाने जळून खाक झाली.
अग्निशमन विभागाचे दोन व एमआयडीसीचा एक असे तीन बंब तब्बल अर्धा तास आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. तरीही आगीत कुशन, भंगार व फॅब्रिकेशनचे दुकान अशी सहा दुकाने जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ, चालक ज्ञानेश्वर चाकणे, नाना सोलट यांनी प्रयत्न केले. दरम्यान, आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र या आगीमुळे शहरात ठिकठिकाणी असलेल्या पत्राशेड दुकानांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा
अहमदनगर : अनधिकृत पत्राशेड काढून टाका : आ. जगताप
पुणे महापालिकेच्या 93 शिक्षकांचे आंदोलन
Nashik : संकटमोचक पुन्हा नाशिकच्या आखाड्यात, उद्या संवाद मेळावा