MP News : डंपर आणि  बसच्या धडकेत 3 ठार; 10 हून अधिक जखमी | पुढारी

MP News : डंपर आणि  बसच्या धडकेत 3 ठार; 10 हून अधिक जखमी

पुढारू ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील मुरैना येथे देव पुरी बाबा परिसरात डंपर आणि प्रवासी बसची धडक झाली.  यामध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १० हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनूसार,  डंपर  ग्वाल्हेरहून दिल्लीला जात होता. (MP News)

मोरेनाचे एसपी शैलेंद्र सिंह चौहान यांनी  माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की,” मुरैना येथे देव पुरी बाबा परिसरात डंपर आणि प्रवासी बसची  धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, तीघांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button