Paithan Crime News : दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यात ३२ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर बेड्या | पुढारी

Paithan Crime News : दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यात ३२ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर बेड्या

पैठण; पुढारी वृत्तसेवा : Paithan Crime News : बिडकीन पोलीस ठाण्यात दरोड्यासारखा गंभीर गुन्ह्यात ३२ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात बिडकीन पोलिसांना यश आले आहे. बिडकीन पोलिसांनी गुरूवारी (दि.८) सापळा रचून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून आरोपीला अटक केली.

अशोक विनायक बर्डे ( रा. भालगाव ता.नेवासा जिल्हा अहमदनगर), असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर ३२ वर्षांपूर्वी बिडकीन पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता.  Paithan Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजीवार यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपीचा शोध घेण्याची मोहीम सुरू होती. आरोपी अशोक पोलिसांची नजर चुकवून नेवासा तालुक्यात राहात होता. याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुराशे यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जाधव, धनेधर, आधाट यांनी गुरुवारी (दि.८) सापळा रचून त्याला नेवासा तालुक्यातून अटक केली. Paithan Crime News

         हेही वाचलंत का? 

 

 

 

Back to top button