बीड : कर्ज वसुलीसाठी गेलेल्‍या फायनान्स अधिकाऱ्याच्या डोक्‍यात लोखंडी रॉड घातला! | पुढारी

बीड : कर्ज वसुलीसाठी गेलेल्‍या फायनान्स अधिकाऱ्याच्या डोक्‍यात लोखंडी रॉड घातला!

केज ; पुढारी वृत्‍तसेवा फायनान्सच्या कर्ज वसुलीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण करून डोक्यात लोखंडी रॉड घालून जखमी केल्याची घटना केज येथे घडली.

या बाबतची माहिती अशी की, उषा केशव राख रा. होळ ता. केज यांच्याकडे स्पंदना फायनान्सचे कर्ज असल्याने दि. ६ जून रोजी त्यांच्याकडे कर्ज वसुलीसाठी दिपक हिराचंद जाधव व शुभंम उमेश ढवारे हे दोघे होळ येथे गेले होते. त्यावेळी कर्जदार आणि वसुलीसाठी आलेले फायनान्सच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्या नंतर उषा केशव राख यांची मुले रोहित केशव राख व रोहन केशव राख या दोघांनी त्यांना केज येथील कळंब चौकात शिवीगाळ आणि दमदाटी केली.

याची माहिती कळंबचे ब्रँच मॅनेजर कैलास पवार यांना फोन वरून दिली आणि केज येथे बोलावले. त्या नुसार कैलास पवार यांनी लोन मॅनेजर अशोक ढेंगळे यांना सोबत घेऊन ते केज मध्ये आले. तेव्हा दि. ६ जून रोजी दुपारी ४:०० वा. सुमारास रोहित राख व रोहन राख यांनी अशोक ढेंगळे व ब्रँच मॅनेजर कैलास पवार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रोहन राख याने त्याच्या गाडीचा लोखंडी रॉड काढुन अशोक ढेंगळे याच्या डोक्यात मारुन जखमी केले. तर रोहित राख याने काठीने आणि दगडाने मारहाण केली. मारहाणीत अशोक ढेंगळे यांच्या डोक्यात मार लागून जखमी होऊन ते बेशुध्द पडल्याने त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार करण्यात आले. या प्रकरणी कर्जदार महिलेच्या दोन्ही मुलांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :  

Back to top button