औरंगाबाद : बंद यशस्वी करण्यासाठी रोहयो मंत्री संदिपान भुमरे उतरले रस्त्यावर | पुढारी

औरंगाबाद : बंद यशस्वी करण्यासाठी रोहयो मंत्री संदिपान भुमरे उतरले रस्त्यावर

पैठण; पुढारी वृत्तसेवा : लखीमपूर हिंसेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून बंद यशस्वी करण्यासाठी राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे स्वत; रस्त्यावर उतरले आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत संदिपान भुमरे हे स्वत: व्यापारी पेठेत फिरून व्यापाऱ्यांनी बंदमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन करत आहेत. यामुळे पैठण तालुक्यात कडेकोट बंद पाळण्यात आला आहे.

यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवा नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेश येथील मंत्रिपुत्राने शेतकऱ्याला वाहनाखाली चिरडले. या घटनेमुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी व्यापार, बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेला आहे. सोमवारी (दि.११) रोजी सकाळी दहा वाजता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे हे आघाडी पक्षातील पदाधिकाऱ्यासोबत या बंदमध्ये सहभागी झाले.

यावेळी संदिपान भुमरेसोबत आघाडी पक्षातील पदाधिकारी माजी आमदार संजय वाघचौरे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष निमेश पटेल, शिवसेनेचे तुषार पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी, जिल्हा दूध संघाचे व्हाईस चेअरमन नंदलाल काळे, तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख किशोर चौधरी, दादा बारे, सोमनाथ परदेशी, नगरसेवक ईश्वर दगडे, संतोष सव्वाशे, कल्याण भुकेले, राजु परदेशी, सुनील हिंगे, सुरेश शेळके, नंदकिशोर नजन, महेश पवार, राजेंद्र मापारी, शहादेव लोहारे, कर्डिले या बंदमध्ये सहभागी झाले होते.

संदिपान भुमरे उतरले रस्त्यावर

पदाधिकाऱ्यासोबत संदिपान भुमरे यांनी शिवाजी चौक, बसस्थानक चौक, खंडोबा मंदिर परिसरात फिरून व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले.

या बंद काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, चव्हाण, अरविंद गटकुळ, सुधीर ओव्हाळ यांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button