हिंगोली : जवळाबाजार बसस्थानक प्रवासी निवाराकडे महामंडळाला पडला विसर! | पुढारी

हिंगोली : जवळाबाजार बसस्थानक प्रवासी निवाराकडे महामंडळाला पडला विसर!

जवळाबाजार(हिंगोली), पुढारी वृत्‍तसेवा : जवळाबाजार येथील बसस्थानक परिसरात  प्रवाशांना उन्हात मिळेल त्या ठिकाणी सावलीचा आसरा घ्‍यावा लागत आहे. परभणी ते हिंगोली  मार्गावर असलेल्या जवळाबाजार येथील बसस्थानकावरून परिसरातील प्रवासी व अनेक मुल व मुली दररोज  शिक्षणसाठी औंढानागनाथ, बाराशिव, हट्टा , झिरोफाटा, परभणी, हिंगोली येते ये-जा करत आहेत.

दरम्‍यान, या भागातून सर्व बसचा थांबा असून नागपुर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, लातुर, अमरावती, अकोला, चंद्रपुर ठिकाणाहून येणारा व जाणारा बसेसचा थांबा असल्‍याने गर्दी असते. तर परभणी ते हिंगोली मार्गावर रस्ताच कामे झाले व प्रत्येक गावाचा ठिकाणी बसस्थानकावर दोन्ही बाजूस प्रवाशी निवारा उभारण्यात आले आहेत. परंतु जवळाबाजार येथील बसस्थानकावर मात्र निवारा उभारण्यात आलेला नाही.

परभणी ते हिंगोली मार्गावर एकमेव जवळाबाजार येथील बसस्थानकावर असे का असा सवाला नागरिकांनी केला आहे. सध्याच परिस्थितीत मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत असून भर उन्हात उभे राहून बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. याकडे एस टी महामंडळाकडून दखल घेऊन बसस्थानक परिसरात तात्काळ निवारा उभा करावा अशी मागणी करण्यात सेत आहे.

.हेही वाचा 

‘आरटीई’च्या यादीची पालकांना प्रतीक्षा; सोडत झाली तरी यादी जाहीर नाही

पिंपरी : नेटपॅकअभावी डिजिटल शिक्षण हॅक; पालिका शाळांतील स्मार्ट टीव्ही शोभेचे

लोणी काळभोर : कर्मचाऱ्यांनी भूमिअभिलेख विभागाचे नाविन्य जपले पाहीजे : अनिल माने

Back to top button