हिंगोली : जवळाबाजार समिती निवडणुकीसाठी आज ४० नामनिर्देशन दाखल | पुढारी

हिंगोली : जवळाबाजार समिती निवडणुकीसाठी आज ४० नामनिर्देशन दाखल

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया २७ मार्चपासून सुरुवात झाली आहे. यासाठी कॄषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ २०२३ ते २०२८  निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज शुक्रवारी (दि. ३१)  ४०  नामनिर्देशन दाखल झाले.

यामध्ये सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघात शामराव नेव्हल, गोविंद दशरथे, बालाजी कावळे, सुंदरराव कुरहे, संजय चव्हाण, परमेश्वर भोंग, नवनाथ कुरहे, राजू वैद्य, वसंतराव राखुंडे, प्रवीण टोम्पे, प्रतापराव चव्हाण, केशवराव ढोबळे, अंकुशराव आहेर, ओमकार बेंडे, प्रभाकर चव्हाण, शांताबाई भोंग, कावेरी बाई आहेर, शंकरराव कदम, विठ्ठलराव जोगदंड, गंगाधर बोंगाणे, शिवाजीराव भालेराव, संतोष शेळके, ग्रामपंचायत अनुसूचित जाती/ जमाती मतदारसंघात  लक्ष्मण कऱ्हाळे, प्रतिभा मानवते तर व्यापारी मतदारसंघात दत्तराव आंभोरे, संदीप सोमानी, राजू पवार, विश्वप्रसाद चव्हाण, राजेश झांझरी, पांडुरंग ढोबळे आणि हमाल व  तोलाई मतदारसंघात शिवाजी शिंदे,  ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात शिवाजी भालेराव, जनार्दन कदम, संभाजी चव्हाण, पांडुरंग बोंगाणे, गजानन ढोबळे यासह ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या देवकाबाई कुरहे, विशाल वैद्य, गजानन ढोबळे, पंढरीनाथ शिरसागर असे एकूण ४० नामनिर्देशन दाखल झाले असून आतापर्यंत एकूण ५८  नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहे.

शनिवार व रविवार सुट्टी असल्याने ३ एप्रिलाच निवडणुक नामनिर्देशन दाखल करण्यात येणार असून नामनिर्देशन दाखल करण्यासाठी आता केवळ एक दिवस उरला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी स्वत: थांबून नामनिर्देशन दाखल करून घेतले. सलग दोन दिवस शासकीय कार्यालयास सुट्टी असल्याने आज सकाळपासूनच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कार्यालयमध्ये  मोठ्याप्रमाणात गर्दी होती.

               हेही वाचलंत का ? 

Back to top button