नेवासा बाजार समिती निवडणुक : बुधवार अखेर 69 अर्जांची विक्री | पुढारी

नेवासा बाजार समिती निवडणुक : बुधवार अखेर 69 अर्जांची विक्री

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तीन दिवसात 69 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून, हमाल मापाडीमधून एकाची, तर इतर मागासवर्गीय म्हणून एक, असे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी तिसर्‍या दिवशी 20 अर्जांची विक्री झाली. नेवासा बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या बाजार समितीवर गडाख गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे.

सोमवारपासून (दि.27) 18 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी सोमवारी 34 उमेदवारी अर्जाची विक्री झाली. दुसर्‍या दिवशी मंगळवारी 15, तिसर्‍या दिवशी 20 अर्जाची विक्री झाली. अशी तिसर्‍या दिवशी अखेर 69 अर्जाची विक्री झाली असून, हमाल मापारी मतदार संघातून एकाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

इतर मागासवर्गीय मतदार संघातून एक, अशी दोन दाखल झालेले आहेत. 3 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. रविवारी आणि गुरवारी सुटी असल्याने शुक्रवारी व सोमवारी इच्छुकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोकुळ नांगरे, सहायक सुखदेव ठोंबरे काम पाहत आहेत.

 

Back to top button