जालना: फूले नाल्यात फेकून शेतकऱ्यांकडून व्यापारांचा निषेध | पुढारी

जालना: फूले नाल्यात फेकून शेतकऱ्यांकडून व्यापारांचा निषेध

जालना: पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात भाजीपाल्याला कमी दर मिळत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. मात्र, भाजीपाला पाठोपाठ आता फुलांचे भाव कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरीही संकटात सापडला आहे. व्यापाऱ्यांनी फुलांना योग्य भाव न दिल्याने आज (दि. ३१) शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फूले नाल्यात फेकून देऊन निषेध नोंदवला. परतूर शहरातील साईबाबा चौकात शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.

शेतीमध्ये राब राब राबून शेतकरी फुलांची काळजी घेतात. मात्र, अपार परिश्रम घेऊन विक्रीसाठी आणलेल्या फुलांना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. व्यापारी उत्तम प्रतीच्या मालाला कवडीमोल दर देत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. अखेर परतूर येथील शेतकऱ्याने आज बाजारात फुलांची विक्री न करता आणलेला तब्बल 15 ते 20 क्विंटल मोगरा, गुलाब ही फुलं नाल्यात फेकून देत व्यापाऱ्यांचा निषेध नोंदवला.

हेही वाचा 

Back to top button