नांदेड : मालवाहू ट्रक-ऑटोचा भीषण अपघात; ४ ठार, ७ गंभीर जखमी | पुढारी

नांदेड : मालवाहू ट्रक-ऑटोचा भीषण अपघात; ४ ठार, ७ गंभीर जखमी

नांदेड, पुढारी वृत्‍तसेवा : मुदखेड रोडवरील मुगट गावाजवळील वळण रस्त्यावर भरधाव मालवाहू ट्रक व ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर सात गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, या अपघातामध्ये सरोजा रमेश भोई (वय 40) बुलढाणा, गाली कल्याण भोई (वय 24) बिड, जाेयल कल्याण भोई (वय- ७ महिने) गेवराई, पुंडलीक किशनराव पोलाटकर ता.भोकर असे मृतांची नावे आहेत तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

.हेही वाचा 

Kolhapur : वडाच्या निर्जीव लाकडातून साकारली सजीव कलाकृती; ‘इश्काची इंगळी’ची रसिकांना भूरळ!

बारामती : प्लास्टिक पिशव्यांच्या कारवाईत सातत्य हवे

देवदर्शनाला गेलेल्यांच्या घरात सहा लाखांची चोरी ; बारामतीच्या म्हाडा कॉलनीतील घटना

Back to top button