Aurangabad : गोवंश प्राण्यांची तस्करी करणारी टोळी जेरबंद | पुढारी

Aurangabad : गोवंश प्राण्यांची तस्करी करणारी टोळी जेरबंद

पुढारी वृत्तसेवा, पैठण : बालानगर (ता.पैठण) परिसरातून गोवंश प्राण्यांची कत्तलीसाठी तस्करी करणारी टोळी एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केली. रविवारी (दि.२७) रोजी रात्री दोन वाजेच्या दरम्यान एका वाहनांमध्ये क्षमतापेक्षा जास्त जनावरे घालून गोवंश प्राण्यांची कत्तलीसाठी तस्करी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पैठण उपविभागाचे डीवायएसपी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि भागवत नागरगोजे, बीट जमादार करतारसिंग सिंगल यांच्या पथकाने सापळा रचला.

बालानगर परिसरातून पीकअप वाहनातून आठ मोठे व एक लहान वासरू एकूण नऊ गोवंश प्राण्यांची कत्तलसाठी तस्करी करताना शेख अजगर शेख मुख्तार (रा. इंदिरानगर, गारखेडा), शेख अरबाज शेख अहमद (रा.छावणी बाजार छत्रपती संभाजीनगर) नावेद कुरेशी (रा. बालानगर ता. पैठण) यांना पकडले. त्याचबरोबर  कत्तलसाठी नेणारी जनावरे व वाहनही ताब्यात घेतले. सोमवारी (दि.२७) रोजी पहाटे या जनावरांना  पैठण पाचोड रोडवरील विजय पांडुरंग गोशाळा येथे सोडण्यात आले.

चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित

पैठण शहरात डॉ. बाबर यांच्या दवाखान्याच्या परिसरात रविवारी (दि.२७) मध्यरात्री जनावरांची चोरी करत असताना काही नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी  तस्करांची व रहिवाशांची मोठी झटापट झाली. यावेळी नागरिकांनी तस्करांनी आणलेल्या वाहनाच्या काचा फोडल्या. हा प्रकार हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे. पैठण पोलीस ठाण्याचा रात्रीचा बंदोबस्त फक्त कागदोपत्री असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

हेही वाचा 

Back to top button