शेतकऱ्यांसाठी फुडसिक्युरिटी आर्मी तयार करणार : पालकमंत्री दिपक केसरकर यांची घोषणा | पुढारी

शेतकऱ्यांसाठी फुडसिक्युरिटी आर्मी तयार करणार : पालकमंत्री दिपक केसरकर यांची घोषणा

राशिवडे; पुढारी वृतसेवा :  लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा एकच नारा दिला होता,त्याचपध्दतीने शेतकरी दिसल्यानंतर सँल्युट केला पाहीजे अशा शेतकऱ्यांच्या आर्मीची निर्मिती करणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केली. ते राशिवडे बु (ता. राधानगरी) येथे जिल्हा कृषी महोत्सव २०२३ उद्घाटनप्रसंगी बोलत होते.यावेळी खासदार संजय मंडलीक,आमदार प्रकाशराव आबीटकर  प्रमुख उपस्थित होते.

नाम केसरकर पुढे म्हणाले की, फुड सिक्युरिटी आर्मी मध्ये शेतकऱ्यांसह त्यांच्या मुलांनाही सर्व प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रे चालविण्यास शिकविली जातील. पश्चिम महाराष्ट्राचे वैशिष्ट्य वेगळेच आहे, या ठिकाणी शेतीसह जोडधंदे केले जातात. फायदा दिसला की तेच ते पिक घेतले जाते, ही वृती बदलुन कुठले पिक घ्यावे हा अभ्यासु निर्णय घेणे गरजेचे आहे. सर्वपिकांचे नुकसान होते पण ऊसपिकाचे शंभर टक्के नुकसान होत नाही. राधानगरीच्या पर्यटनाला तसेच कृषीला चालना देण्यासाठी प्रयत्न करु असे सांगुन पुढील वर्षापासुन इंजिनिअरिंगचे शिक्षण मराठीमध्ये देणार असल्याचे सांगितले.

खासदार संजय मंडलीक म्हणाले की, शेतीमध्ये योग्य नियोजन करणे महत्वाचे आहे, आधुनिक शेतीची माहीती घेऊन नियोजनबध्द शेती करणे गरजेचे आहे. शासनाच्या कृषी योजना स्थानिक स्तरापर्यत पोहोचने गरजेचे आहे.आमदार प्रकाशराव आबीटकर म्हणाले की, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रगत शेती  करणे सोपे जाते,तयासाठी कष्टासह तंत्रज्ञान राबविणे गरजेचे आहे जिल्हा कृषी महोत्सव पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये होत असल्याने याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, या महोत्सवामध्ये अतिशय व्यापक व्यवस्था कृषीमहोत्सवामध्ये केली आहे. ग्रामीण भागामध्ये हा महोत्सव घेण्याचा उद्देश इतकाच आहे की,शेतीक्षेत्रामध्ये जे भदल होत आहेत, त्याबाबी शेतकर्यांपर्यत पोहोचवणे आवश्यक आहे. अशा विविध क्षेत्रांची माहीत सविस्तरपणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देत आहोत.

Back to top button