नांदेड : ऑटो पलटी झाल्याने चालक ठार | पुढारी

नांदेड : ऑटो पलटी झाल्याने चालक ठार

उमरी; पुढारी वृत्तसेवा : गणिपुर येथे ऑटो पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रवाशांना सोडून गावी परत येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. लक्ष्मण बाबाराव येडलेवाड (वय 35) असे मृत चालकाचे नाव आहे.

गणिपुर येथील ऑटोचालक लक्ष्मण येडलेवाड हे गावातील काही प्रवाशांना घेऊन उमरी येथे गेले होते. तेथून परत येताना गणिपुर शिवाराजवळ आले असता त्यांचा ऑटोवरील ताबा सुटला. यामुळे ऑटो पलटी झाली. यामध्ये लक्ष्मण डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी उमरी शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button