हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील २ हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका | पुढारी

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील २ हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यात शनिवारी दुपारी अचानक अवकाळी पावसासह गारांचा पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संपातील कर्मचारी रविवारी (दि.१९) शेतशिवारात दाखल झाले. या पाहणीत सुमारे २ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

औंढा नागनाथ तालुक्यात शनिवारी वादळी- वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे गहू ,ज्वारी, हरभरा या उभ्या पिकांसह फळबागा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. या पिकांचे पंचनामे होणार असल्याची माहिती तहसीलदार कृष्णा कांगुले यांनी दिली होती. त्यानुसार त्यांनी या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक अधिकारी हे संपात सहभागी असूनदेखील पंचनामे करण्यासाठी नुकसानग्रस्त गावांमध्ये दाखल झाले. यावेळी तालुक्यातून सुमारे दोन हजार हेक्टरवर नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल आधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला आहे.

           हेही वाचलंत का ?

 

Back to top button