बीड: कुंभारवाडीत विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त; एकावर कारवाई | पुढारी

बीड: कुंभारवाडीत विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त; एकावर कारवाई

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कुंभारवाडी येथील एका घरात गांजा विक्रीसाठी आणला होता. याची माहिती  गेवराई पोलिसांना मिळाली. त्यानुसार ठाणे प्रमुख धनंजय फराटे यांनी आपल्या टीमसह तेथे धाड टाकली असता त्याठिकाणी तब्बल दहा किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले.

कुंभारवाडी येथील दादासाहेब रंगनाथ जाधव यांच्या घरी गांजा असून त्याची चोरटी विक्री होत असल्याची माहिती ठाणेप्रमुख धनंजय फराटे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आज (दि.३) सकाळी सात वाजता आपल्या कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी 10 किलो गांजासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सपोनि. जवंजाळ, पोलीस उपनिरीक्षक भुतेकर, सहायक फौजदार गर्जे,   यांनी केली.

                 हेही वाचलंत का ?

Back to top button