कोल्हापूर : पन्हाळ्यात शॉर्ट सर्किटने घराला आग | पुढारी

कोल्हापूर : पन्हाळ्यात शॉर्ट सर्किटने घराला आग

 पन्हाळा; पुढारी वृत्त सेवा: पन्हाळा (जि.कोल्हापूर) येथील बाजीप्रभू चौक परिसरातील वाहन तळाच्या शेजारी असणाऱ्या श्रीमती शैलजा रवींद्र कदम ( पन्हाळा ) यांच्या घराला गुरुवारी (दि.२) रात्री शॉर्ट सर्किट झाल्याने  मोठी आग लागली. शैलजा कदम या  घराबाहेर गेल्या असताना ही आग अचानक  लागली असून घराच्या  कौलारू छतामधून आगीचे लोट येताना दिसत होते. घरी कोणी नसल्याने अनर्थ टळला. कोणतीही जीवित हानी घडलेली नाही. तर प्रापंचिक साहित्याचे अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

कोल्हापूर : अंदाजे दोन लाखाचे नुकसान

पन्हाळा येथील शैलजा रवींद्र कदम यांच्या घराला  गुरुवारी (दि.२) रात्री शॉर्ट सर्किट झाल्याने  मोठी आग लागली. हा प्रकार कदम कुटूंबिय घरात नसताना घडल्याचे सांगण्यात आले आहे. घराच्या  कौलारू छतामधून आगीचे लोट येताच आग लागल्याचे लक्षात आले. यात कोणतेही जीवित हानी झालेली नाही,  प्रापंचिक साहित्याचे अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. सर्व जीवनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे. घराचे कौलारू छत देखील जळून कोसळले आहे. या आगीमुळे घराचे  नुकसान झाले आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. मात्र शॉर्टसर्किट झाले असावे, असा कयास आहे. आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने ही माहिती  पन्हाळ नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला देण्यात आले. पन्हाळा अग्निशमन दलाच्या पाच मिनिटात दाखल होत ही आग आटोक्यात आणली.  यावेळी शेजारी, नातेवाईक व  युवकांनी ही आग विझवण्यासाठी मदत केली. आज पन्हाळा तहसीलदार कार्यालयाकडून पन्हाळा तलाठी वैभव कोळी यांनी पंचनामा केला. त्यानुसार दोन लाखाचे नुकसान झाले आहे, असे पंचनाम्यात नमूद करण्यात आले.

हेही वाचा

Back to top button