उस्मानाबाद : वडिलाकडून एकुलत्या एका मुलाचा दगडाने ठेचून खून | पुढारी

उस्मानाबाद : वडिलाकडून एकुलत्या एका मुलाचा दगडाने ठेचून खून

येरमाळा, पुढारी वतसेवा : दारू पिऊन आई-वडिलांनाच ठार मारण्याची धमकी देणाऱ्या एकुलत्या एका मुलाचा बापानेच दगडाने ठेचून खून केल्याची घटना येरमाळ्यात गुरुवारी (दि.२) पहाटे ५वाजण्याच्या सुमारास घडली. रामराजे सतीश बारकुल (वय २३) असे मृत मुलाचे नाव आहे. संशयित आरोपी सतीश बारकुल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामराजे बारकुल हा येरमाळा येथे आपल्या आई- वडिलांसोबत राहत होता. व्यसनाच्या आहारी गेलेला रामराजे हा नियमित मद्यपान करून आई-वडिलास ठार मारण्याची धमकी देत होता. बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घरी येऊन त्याने त्याच्या आईला ठार मारण्याची धमकी दिली. नंतर झोपण्यासाठी शेताकडे निघून गेला. रामराजे याचे वडील सतीश बारकुल हे रोजच्या त्याच्या या प्रकाराला वैतागले होते.

गुरुवारी पहाटे ५ वाजता नेहमीप्रमाणे शेताकडे गेल्यानंतर मुलगा रामराजे याने शेती नावावर करून दे, असे म्हणत वडिलासोबतच झटापट केली. यात खाली पडलेल्या रामराजे याच्या डोक्यात दगड घालून व चेहरा ठेचून वडील सतीश यांनी त्याचा खून केला. गुरूवारी रात्री ९ च्या सुमारास गुन्हा दाखल केला.

हेही वाचा 

Back to top button