हिंगोली : नाफेड हरभरा खरेदी नोंदणी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी | पुढारी

हिंगोली : नाफेड हरभरा खरेदी नोंदणी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : जवळाबाजार परिसरात रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हरभरा पिकांची पेरणी केलेली आहे. मात्र अद्यापही नाफेड खरेदी केंद्रांकडून हरभरा उत्पादीत माल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू केलेली नाही. त्यामुळे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जवळाबाजार परिसरात खरीप हंगामातील सोयाबीन नगदी पीकानंतर रब्बी हंगामात हरभरा नगदी पीक घेतले जाते. धरणाचे मुबलक पाणी तसेच विहीर आणि बोर असल्याने परिसरात मोठ्याप्रमाणात हरभरा पेरणी करण्यात आली. सध्या हरभरा उत्पादित माल तयार होण्यास सुरुवात झाली आहे. नाफेडकडून हरभरा खरेदी भाव ५३००/ रूपये हमी भाव खरेदी नाफेड केंद्रात करण्यात येणार असून  नाफेड दरवर्षी ८ ते १५ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदीची नोंदणी करते. यावेळी मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची नोंदणी सुरू झालेली नाही. नाफेडकडूनच आदेश आले नाहीत, असे येथील खरेदी केंद्रांकडून सांगितले जाते. परिणामी शेतकऱ्यांना सध्या हरभरा १ हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमी भावात विक्री करावा लागत आहे. राज्यशासनाकडून याबाबत दखल घेऊन नाफेडकडून हरभरा खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button