हिंगोली : लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर दोन वर्ष अत्याचार | पुढारी

हिंगोली : लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर दोन वर्ष अत्याचार

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यात एका १९ वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून दोन वर्ष अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने बाळापूर पोलिस ठाण्यात फिर्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी दिगंबर देवराव पतंगे (रा. कवडी) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला बुधवारी (दि.१६) ताब्यात घेतले.

याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील दिगंबर पतंगे पिडीत मुलीला पुणे, शेगाव यासह अन्य शहरांत नेत. महागड्या वस्तू भेट देवून, लग्नाचे आमिष दाखवीत तिच्यावर अत्याचार करत. २०२१ पासून हा प्रकार सुरू होता. दोन वर्ष उलटूनही संशयित लग्न करीत नसल्याने तरुणीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. त्याने नकार दिल्याने तरूणीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :

Back to top button