अदानी प्रकरणावरून औरंगाबादमध्ये काँग्रेसचे आंदोलन, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी | पुढारी

अदानी प्रकरणावरून औरंगाबादमध्ये काँग्रेसचे आंदोलन, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : अदानी के साथ भी, अदानी के पिछे भी मोदी-भाजप सरकार…, हम दो हमारे दो, देश को बेच दो…, बीजेपी का एकही नारा देश को बेच दो…, खाऊंगा ना खाने दूंगा देश सारा बेच दूंगा…, अशा घोषणा देत गौतम अदानी प्रकरणावरून औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज (दि.६)  एसबीआय बँकेसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.

आज देशभरात काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे. औरंगाबादमध्ये सिडको कॅनॉट परिसरातील एसबीआय बँकेसमोर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष यूसूफ शेख, प्रभारी अॅड. मुजाहिद खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने उदयोगपती अदानींवर मेहरबानी दाखवत एसबीआय व एलआयसी या संस्थांमधील सर्वसामान्यांच्या कष्टाचा पैसा धोक्यात टाकला आहे. हा पैसा परत मिळेल का? असा सवाल यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अदानींकडून वसूली झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी स्थानिक कलावंतांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले होते.

Back to top button