अदानी प्रकरणावरून विरोधकांचा गदारोळ, लोकसभा-राज्यसभेचे कामकाज तहकूब | पुढारी

अदानी प्रकरणावरून विरोधकांचा गदारोळ, लोकसभा-राज्यसभेचे कामकाज तहकूब

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन : देशाचा अर्थसंकल्‍प मांडल्‍यानंतर सभागृहात अजुनपर्यंत कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. गौतम अदानी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच ठेवला आहे. विरोधक या प्रकरणी संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी करत आहेत.

दुसरीकडे, सत्ताधारी पक्ष राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेची मागणी करत आहे. आजही विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्‍यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून आज देशभरात एलआयसीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली जात आहेत.

हेही वाचा : 

Back to top button