

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात येत्या २६ फेब्रुवारीला कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुका पार पडणार आहेत. यासाठी आज भारतीय जनता पार्टी आणि महाआघाडी पुरस्कृत उमेदवाराने आज अर्ज भरला. पण यात आता 'आम आदमी पार्टीने' उडी घेतली आहे. आम आदमी पक्ष पोटनिवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पुणे महापालिकेच्या निमित्ताने आम आदमी पक्षातर्फे तयारी सुरू होती. कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागल्याने आम्ही जोमाने कामाला लागून निवडणूक लढवणार. टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली नाही म्हणून बिनविरोध किंवा निवडणूक लढवायची नाही असे नाही. देशात लोकशाही आहे. पक्षातून ९ इच्छुक उमेदवार आहेत. केंद्रातून ए बी फॉर्म आले असून मी उद्या अर्ज भरणार आहे.
– विजय कुंभार (प्रदेश संघटक,आदमी पक्ष)