बीड : मुलाने डोक्यात खोऱ्याने घाव घालून जन्मदात्या बापाला संपवले; माजलगाव तालुक्यातील खळबळजनक घटना | पुढारी

बीड : मुलाने डोक्यात खोऱ्याने घाव घालून जन्मदात्या बापाला संपवले; माजलगाव तालुक्यातील खळबळजनक घटना

टाकरवण; पुढारी वृत्तसेवा : झोपेत असलेल्या जन्मदात्या बापाच्या डोक्यात खोऱ्याने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथे आज (दि.२) सकाळी घडली. मारोती लक्ष्मण भुंबे (वय ५५, रा. टाकरवन) असे मृत वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसांनी बाळू उर्फ लक्ष्मण मारोती भुंबे (वय ३१) या संशयीत आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारोती भुंबे यांनी त्यांचा मुलगा बाळू उर्फ लक्ष्मण हा मागील आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार माजलगाव ग्रामीण पोलिसांत दिली होती. त्याचा शोध सुरू असतानाच आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास तो घरी आला. यावेळी झोपेत असलेल्या वडील मारोती यांच्या डोक्यावर खोऱ्याने घाव घातले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मारोती यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयीत आरोपीस ताब्यात घेतले.

हेही वाचा :

Back to top button