पुणे : येरवड्यात गुंडांच्या टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड….दहा ते पंधरा वाहनांचे नुकसान | पुढारी

पुणे : येरवड्यात गुंडांच्या टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड....दहा ते पंधरा वाहनांचे नुकसान

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  येरवड्यात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या टोळक्याने लक्ष्मी नगर परिसरातील वाहनांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या गंभीर घटनेत रिक्षा, दुचाकी ,स्कूल व्हॅन तसेच इतर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दहशत पसरविण्यासाठी नशेमधील गुंडांच्या टोळक्याने हे कृत्य केल्याचे समजते. येरवडा लक्ष्मी नगर परिसरात वाहनांची तोडफोड, पेट्रोल चोरी, हत्यारे घेऊन दहशत निर्माण करणे हे प्रकार वारंवार घडत आहेत.

गंभीर घटनांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झालेले आहेत. घटनास्थळी येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झालेले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. काही संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले. एकंदरीतच गुन्हेगारांकडून दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्यामुळे येरवडा लक्ष्मी नगर परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Back to top button