बीड : माजलगाव-तेलगाव रस्त्यावर स्विफ्ट-दुचाकीचा अपघात; तिघांचा मृत्यू | पुढारी

बीड : माजलगाव-तेलगाव रस्त्यावर स्विफ्ट-दुचाकीचा अपघात; तिघांचा मृत्यू

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील माजलगाव ते तेलगाव दरम्यान असलेल्या राजेवाडी फाट्या नाजिक स्विफ्ट कार आणि दुचाकीमध्ये मोठा अपघात झाला. या अपघातात कामावरून परतणारे ३ मजूर जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी (दि.१) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. लक्ष्मण सुभाष कापसे (वय ३७), नितीन भाऊसाहेब हुलगे (३०) आणि अण्णा बळीराम खटके (२७) असे अपघात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिकची माहिती अशी की, तेलगाव या ठिकाणी मजुरीचे करणारे लक्ष्मण कापसे, नितीन हुलगे आणि आण्णा खटके हे आपले काम आटोपून येत असताना स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील वरील दोघेजण जागीच ठार झाले. तर गंभीर अवस्थेत असलेल्या एकास माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेले तिघेही लहामेवाडी येथील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button