हिंगोली : महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून दागिने, रोकड लांबवली | पुढारी

हिंगोली : महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून दागिने, रोकड लांबवली

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : मोफत धान्य मिळवून देण्याचे अमिष दाखवून महिलेला बाजारातून बाजूला नेले. बाजूला जाताच तोंडावर स्प्रे मारून अंगावरील दागिने व रोख ४० हजार रुपये पळविले. या प्रकरणी दोन अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.18) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमांतून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील येडुद येथील द्वारकाबाई बळीराम भुक्तार (वय ६५) ह्या काल मंगळवर (दि.17) हिंगोली येथे बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी तरुण त्यांच्या जवळ आले. तुम्हाला मोफत धान्य मिळते त्यासाठी कागदपत्रे देतो असे सांगून त्यांना बाजारातून बाजूला नेले. त्यानंतर त्यांच्या तोंडावर स्प्रे मारला. यामुळे द्वारकाबाई बेशुध्द झाल्या. यावेळी त्या दोन तरुणांना त्यांच्या अंगावरील चांदीचे दागिने व हातातील चांदीचे कडे तसेच त्यांच्या जवळ असलेली ४० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

दरम्यान, अर्धा ते एक तासानंतर द्वारकाबाई शुध्दीवर आल्या. यानंतर त्‍यांनी पैसे आणि दागिने शोधले मात्र त्‍या चोरांनी पळवल्‍याचे लक्षात आले. या प्रकारानंतर त्‍या प्रचंड घाबरल्या आणि गावी जाऊन आपल्‍या कुटुंबाला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी बुधवारी शहर पोलिस ठाणे याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीनंती पोलिसांनी दोन अज्ञाताविरोधात गुल्‍हा दाखल केला आहे. तसेच पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमांतून आरोपींचा शोध घेत आहेत.

.हेही वाचा 

नांदेड: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कारच्या धडकेत काम करणारे २ परप्रांतीय कर्मचारी ठार, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मालपाणी कंपनीजवळ अपघात

नागपूर शिक्षक विधान परिषद निवडणूक : काँग्रेसच्या पाठिंब्याचा घोळ संपेना

Back to top button