नांदेड: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू | पुढारी

नांदेड: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

शंकरनगर: पुढारी वृत्तसेवा : नांदेड-देगलूर राज्य महामार्गावर धुप्पा (ता. नायगाव) शिवारात मंगळवारी (दि. १७) रात्री दहा वाजेच्या सुमारास दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गौतम झरीबा हणमंते (वय 35, रा. धुप्पा ता.नायगाव) असे मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गौतम हणमंते दुचाकीवरून (एम.एच.14 इ.एफ.1890) नरसीकडून शंकरनगरकडे येत होते. यावेळी धुप्पा शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button