जालना : गणपतीचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला, अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू | पुढारी

जालना : गणपतीचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला, अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : अंगारकी संकष्टी निमित्त श्रीक्षेत्र राजूर गणपती येथून गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दोघा तरुणांवर काळाने घाला घातला. मोटर सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले. जखमींना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. चौघेही तरुण दर्शनासाठी एकाच मोटर सायकलवरून गेले होते.

निलेश हिरालाल चव्हाण ( वय २०) प्रशांत आरके (वय २१, दोघेही रा. भोकरदन) असे मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. तर अनिकेत बाळू वाहुळे (वय १९) आणि आरेफ सलीम कुरेशी (वय २२, रा. नवे भोकरदन) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. अधिक माहिती अशी की, आज अंगारकी संकष्टी असल्याने चौघे मित्र एकाच दुचाकीवरून गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर भोकरदनकडे येत असताना टेपले पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात निलेश आणि प्रशांत जागीच ठार झाले. तर अनिकेत आणि आरेफ गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचा :

Back to top button