श्रद्धा खून प्रकरण: आरोपी आफताब पुनावालाच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ | पुढारी

श्रद्धा खून प्रकरण: आरोपी आफताब पुनावालाच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

पुढारी ऑनलाईन: श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयाने आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत पुढील १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

आफताबची कोठडीची मुदत संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्या न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले होते. उभय बाजुंचा युकि्तवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आफताबची आणखी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश दिला. आरोपी आफताब याने कोठडी दरम्यान अभ्यासासाठी काही कायद्याच्या पुस्तकांची मागणी केली आहे. तसेच थंडी असल्याने आफताब याला उबदार कपडे देण्याचे आदेशही न्यायालयाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

यापूर्वी ४ जानेवारी रोजी या प्रकरणात नवे खुलासे समोर आले आहेत. श्रद्धाच्या मायटोकॉन्ड्रियल डीएनए रिपोर्टमध्ये श्रद्धाच्या केस आणि हाडांचे नमुने जुळल्याची माहिती समोर आली आहे. ते तपासासाठी हैदराबादला पाठवण्यात आले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे विशेष पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था झोन-II) डॉ. सागरप्रीत हुडा यांनी दिली आहे.

विशेष पोलिस आयुक्त डॉ. सागरप्रीत हुड्डा यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांना हैदराबादमधील डीएनए फिंगरप्रिंट आणि डायग्नोस्टिक केंद्राकडून अहवाल प्राप्त झाला आहे. आता दिल्ली पोलीस श्रद्धाच्या अस्थी पोस्टमॉर्टमसाठी पाठवणार आहेत. गेल्या महिन्यात डीएनए चाचणीही करण्यात आली होती. यामध्ये दिल्लीच्या जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला असल्याची माहिती समोर आली होती.

हेही वाचा:

Back to top button