लातूर : सोयरीक मोडल्याबाबत विचारणा करण्‍यासाठी गेलेल्‍या भावाचा खून

File Photo
File Photo

लातूर, पुढारी वृत्‍तसेवा :  बहिणीची सोयरीक मोडल्याबाबत विचारणा करण्‍यासाठी गेलेल्‍या तरुणाचा धारदार हत्‍याराने वार करत खून करण्‍यात आला. ही खळबळजनक घटना शनिवारी (दि.२४) सायंकाळी औराद शहाजानी येथील मुख्य चौकात घडली. अखिल जलील बेलूरे, (वय २५) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. हल्‍ल्‍यात अखिलचा मित्र बब्बू लायकपाशा भातंब्रे, (वय-२४) याच्‍यासह मारेकरी बबलू महेताबसाब बागवान (वय- २५) हा जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, औराद शहाजानी येथील अखिल व बब्बू  हे बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारण्यासाठी फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या बबलू बागवानकडे सायंकाळी  गेले होते.

अखिल याने बबलू याला जाब विचारला. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या वेळी बबलू बागवान यांने नारळ छीलन्याच्या हत्याराने अखिल  व बब्बू यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यातअखिल बेलूरे याचा जागीच मृत्‍यू झाला. तर बब्‍बू भातंब्रे याच्‍यासह  आरोपी बबलू बागवान जखमी झाला. बब्बू भातंब्रे याच्यावर निलंगा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news