परभणी : मानवत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व | पुढारी

परभणी : मानवत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व

मानवत; पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यात ८ ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीने ८ पैकी ३ ग्रामपंचायतीमध्ये बहुमत मिळवले असून, उद्धव ठाकरे शिवसेना २ , शिंदे गट, भाजप व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांना प्रत्येकी १ ग्रामपंचायतमध्ये यश मिळवलेआहे. तालुक्यात काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही.

मानवत येथील तहसील कार्यालयात आज (दि. २०) मतमोजणी झाली. सरपंचपदासाठी आंबेगाव ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे नेते पंकज आंबेगावकर यांच्या पॅनलचे पांडुरंग सुदाम जाधव, कोल्हावाडीमध्ये विठ्ठल भिसे यांच्या गटाच्या जिजाबाई लक्ष्मण आठवे आणि  वझुर बु. येथेही राष्ट्रवादीच्या रेखा अशोक चव्हाण यांनी बाजी मारली. देवळगाव येथे केशव लक्ष्मण आवचार तर रत्नापूर येथे चक्रधर रामकिशन राजे हे सरपंचपदी निवडून आल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला देवलगाव आवचार व रत्नापूर ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यात यश आले.

 माणोली ग्रामपंचायतमध्ये बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या प्रियंका भागवत पानझाडे ह्या विजयी झाल्या. तालुक्यातील इरळद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते लिंबाजी कचरे पाटील यांनी दुसऱ्या वेळेस सत्ता खेचून आणल्याने आसराबाई राधाजी डोळसे ह्या विजयी झाल्या. सोनुळा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून, याठिकाणी भाजपच्या स्वराज्य जनविकास पॅनलच्या संताबाई शाम गिरी यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे.

हेही वाचा :

Back to top button