नांदेड : आटाळामध्ये नवयुवक पॅनलचे, तर बाभूळगाव ग्रा. पं. वर काँग्रेसचे वर्चस्व | पुढारी

नांदेड : आटाळामध्ये नवयुवक पॅनलचे, तर बाभूळगाव ग्रा. पं. वर काँग्रेसचे वर्चस्व

धर्माबाद; पुढारी वृत्तसेवा : धर्माबाद तालुक्यातील आटाळा व बाभूळगाव या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज ( दि. २०) जाहीर झाले. आटाळा या गावी एकूण ४ सदस्य व सरपंचपदासाठी निवडणूक झाली होती. यात नवयुवक पॅनल गटाचे ४ सदस्य व सरपंचपदाचा उमेदवार विजयी झाला. याआधी ३ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. एसटी प्रवर्गास उमेदवार न मिळाल्याने ही एक जागा रिक्त राहिली आहे.

बाभूळगाव या गावातील देखील ३ सदस्य अगोदरच बिनविरोध निवड करण्यात आले. ४ सदस्य व सरपंच पदासाठी निवडणूक झाली. यात बाजार समितीचे माजी संचालक व माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे विश्वासू व्यंकट पाटील मोरे यांच्या पॅनलमधून ३ जण विजयी झाले. सरपंच पदांसह या ठिकाणी त्यांनी आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले.

ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक पातळीवरची निवडणूक असते. त्यामुळे पक्षापेक्षा स्थानिक पॅनल व व्यक्तीला विशेष महत्त्व असते. या टप्प्यात ३ गावे होती. या पैकी रोषणगाव येथील ८ सदस्य व सरपंचपदाची निवड अगोदरच बिनविरोध करण्यात आली होती. ग्रामपंचायत निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाला नाही. मतमोजणी वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button