कोल्हापूर : निढोरी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर; भाजपाला सत्ता आणि समर्थकांचा जल्लोष | पुढारी

कोल्हापूर : निढोरी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर; भाजपाला सत्ता आणि समर्थकांचा जल्लोष

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : निढोरी (ता.कागल ) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी मंडलिक – मुश्रीफ आघाडीचा धुवा उडवत भाजपने मुंसडी मारली. समरजितसिंह घाटगे यांच्या सुनील सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी गटाने सरपंच पदासह सहा जागा जिंकत सत्तांतर घडवून आणले आहे.

सरपंचपदाचे उमेदवार शुभांगी योगेश सुतार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार निशिगंधा अमित पाटील यांचा २२० मताची पराभव केला आहे. विजयी सरपंच शुभांगी सुतार यांना १०९७ तर पराभूत उमेदवार पाटील यांना ८७७ मते मिळाली. विजयी भाजपाचे उमेदवारांमध्ये रणजीतसिंह सूर्यवंशी, संपतराव मगदुम, एकनाथ कळमकर, तजेस्विनी चितळे, सुजाता सुतार, अल्का गुरव, यांचा तर मंडलिक -मुश्रीफ आघाडीच्या उमेदवारात उषा कांबळे, सरीता मगदुम, अमोल सुतार यांचा समावेश आहे.

सत्ताधारी गटाकडून आठ कोटी विकास कामांचा अजेंडा राबविण्यात आल्याचे जाहीर प्रसिद्ध पत्रक काढले होते. तर राजे गटाकडून सर्वांना विश्वासात घेऊन चांगला कारभार करु, असे आश्वासन दिले होते. मतदारांनी योग्य दिशा निवडून सत्तांतर केल्याचे निवडणूक निकालानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. निकालानंतर भाजपच्या विजयी उमेदवारासह समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला.

हेही वाचा :

Back to top button