औरंगाबाद : महा आवास अभियानातील उत्कृष्ट कामगिरीत औरंगाबाद जिल्हा प्रथम | पुढारी

औरंगाबाद : महा आवास अभियानातील उत्कृष्ट कामगिरीत औरंगाबाद जिल्हा प्रथम

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : ‘महा आवास अभियान 2020-21’ मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल औरंगाबाद जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सीईओ विकास मीना व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगिता पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचीही उपस्थिती होती. गुरुवारी (दि.24) दुपारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर ऑडिटोरियममध्ये ‘अमृत महा आवास अभियान 2022-23’ चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.

या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अभियानादरम्यात मुलभूत नागरी सुविधा देऊन आदर्श घरांची निर्मिती केल्याबद्दल औरंगाबाद जिल्ह्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Back to top button