Measles Disease : मुंबई, ठाण्यापाठोपाठ पनवेल शहरात ‘गोवर’चा शिरकाव | पुढारी

Measles Disease : मुंबई, ठाण्यापाठोपाठ पनवेल शहरात 'गोवर'चा शिरकाव

पनवेल: पुढारी वृत्तसेवा: मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ आता पनवेल महापालिका हद्दीत गोवर आजाराचा ‘Measles Disease’ शिरकाव झाला आहे. पालिका हद्दीतील बालकांना याची लागण झाल्‍याचे आढल्‍याची माहिती पालिका वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली. हे तीनही रुग्ण बरे असून, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव संपल्यानंतर आता राज्यात गोवर आजाराने (Measles Disease) तोंड काढले आहे. मुंबई, ठाणे, नाशिक तसेच अन्य शहरात गोवर आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. मुबई शहरात गोवर रुग्णांचा उद्रेक झालेला पहायला मिळाला. या आजारामुळे मुंबई, नाशिक शहरातील काही रुग्ण दगावले आहेत. सध्या मृतांचा आकडा वाढत असल्यामुळे या आजाराची चर्चा  मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

मुंबईनंतर आता पनवेल महापालिका हद्दीत गोवरचा शिरकाव झाल्याचे आढळून आले आहे. बुधवारी जवळपास तीन रुग्ण पालिका हद्दीतील पनवेल, नवीन पनवेल आणि तक्का शहरात आढळून आले आहेत. पालिका हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची तपासणी केल्यानंतर या रुग्णांची माहिती मिळाली आहे. त्यानंतर पालिकेच्या वैद्यकीय टीमने अधिक तपास केल्यानंतर १६ संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिकेच्या प्रभारी अधिकारी डॉ. मुजावर यांनी दिली आहे. या सर्व रुग्णांवर त्याच्या घरीच उपचार सुरू असून प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे.

Measles Disease : मुलांना ताप आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधा

पनवेल महापालिका हद्दीत गोवर आजाराचे १६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या रक्ताच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त तीन रुग्णांना गोवरची लागण झाली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याला ताप येत असेल, तर त्याच्यावर लगेच उपचार सुरू करावेत आणि याची माहिती जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला द्यावी, असे आवाहन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुजावर यांनी केले आहे.

हेही वाचा :  

Back to top button