परभणी : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आढळला प्राध्यापकाचा मृतदेह | पुढारी

परभणी : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आढळला प्राध्यापकाचा मृतदेह

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर शहरातील येलदरी रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापकाचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज (गुरुवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. जगदीश ज्ञानोबा गव्हाणे, असे मृत प्राध्यापकाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील उपहारगृहाच्या मागील बाजूस विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राध्यापक जगदीश गव्हाणे यांचा मृतदेह पडलेला दिसला. विद्यार्थ्यांनी ही माहिती प्राचार्यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ जिंतूर पोलीस ठाण्याला कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अधिक तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button