पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड दिवा मलायका अरोराशी लग्न करणार असल्याची चर्चा रंगलीय. कारण आहे-तिची लेटेस्ट पोस्ट. मलायकाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक अशी पोस्ट शेअर केलीय, ज्यानंतर तिच्या लग्नाची चर्चा जोरदार सुरु आहे. (malaika arora ) मलायकाने लाजताना आपला एक सुंदर फोटो शेअर केलाय. फोटोमध्ये मलायका ब्लॅक टॉपमध्ये दिसतेय. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- I said YES ???… मलायकाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्ट समोर येताच फॅन्स मलायकाला विचारताहेत की, काय तिने लग्नासाठी हो म्हटलं आहे? अनेक सोशल मीडिया युजर्स तर मलायकाच्या पोस्टवर शॉकिंग रिॲक्शन देत आहेत. तर अनेक फॅन्सनी तिला शुभेच्छा देणं सुरु केलं आहे. (malaika arora )
आता मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत सात फेरे घेणार की नाही याविषयी तर्क-वितर्क लावत आहेत. पण, तिच्या या पोस्टने फॅन्सची उत्सुकता वाढवली आहे. तर काही सूत्रांच्या माहितीनुसार, असे वृत्त समोर आले आहे की, मलायका लग्न करत नाहीये. तर ही एक प्रमोशनल पोस्ट आहे.
मलायका अर्जुन कपूरला दीर्घकाळ डेट करतेय. दोघांची रोमँटिक लाईफ चर्चेत राहते. अर्जुन-मलायका एकमेकांबद्दल कौतुक करताना थकत नाही. दोघे वेकेशन ते बी टाऊनच्या पार्टीजपर्यंत एकमेकांचे एकत्र दिसतात. मलायका आणि अर्जुनची सिजलिंग केमिस्ट्री फॅन्सना कपल गोल्स देते.
दोघांनी जेव्हापासून आपलं प्रेम ऑफिशियल केलं आहे, तेव्हापासून दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहेत. मलायका आणइ अर्जुन आता खरचं लग्न करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.