जॅकलीन फर्नांडिसला अटक का करीत नाही : न्यायालयाची ‘ईडी’ला विचारणा | पुढारी

जॅकलीन फर्नांडिसला अटक का करीत नाही : न्यायालयाची 'ईडी'ला विचारणा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलेले असूनही अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, अशी विचारणा पटियाला हाऊस न्यायालयाने आज (दि. १०) सक्तवसुली संचलनालयाला केली. घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित प्रकरणात जॅकलीनवर गंभीर आरोप झाले आहेत. दरम्यान जॅकलीनच्या जामीन अर्जावर शुक्रवारी निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सुकेशच्या हवाला प्रकरणाच्या संदर्भात संशय आणि पुराव्यांच्या आधारे जॅकलीनची तपास संस्थांकडून चौकशी सुरु आहे. जॅकलीनने देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच तपासात सहयोग न केल्याचा दावा ईडीकडून पटियाला हाऊस न्यायालयात करण्यात आला.

जॅकलीनने सात कोटींची केली चैनी

जॅकलीनने सात कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशाची चैनी केली असल्याचेही ईडीकडून सांगण्यात आले. यावर तिच्याविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी आहे, तर मग तिला अटक केली का नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली. दरम्यान सुनावणीदरम्यान ईडीकडून आपल्याला प्रताडित केले जात असल्याचा दावा जॅकलिनने केला. नियमित जामीनअर्ज मंजूर केला जावा, अशी विनंतीही तिने केली.

हेही वाचा : 

Back to top button