PSI : जिल्हा शस्त्रागारातून पिस्तूल व ३५ काडतुसे लंपास करणा-या तोतया पीएसआयवर आठ वर्षानंतर गुन्हा

police
police
Published on
Updated on

बुलढाणा पुढारी वृत्तसेवा : स्वत:ला पोलीस उपनिरिक्षक (PSI) म्हणविणा-या एका तोतयाने बनावट कागदपत्रांच्या आधारावर जिल्हा पोलिस मुख्यालयातील शस्त्रागारातून एक पिस्तूल व ३५ जीवंत काडतुसे लंपास केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आठ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असून १२ आक्टोबरला बुलढाणा शहर पोलिसात अज्ञात तोतयावर गुन्हा दाखल झाला आहे.

PSI पिस्तूल व ३५ काडतुसे लंपास 

माहितीनुसार एका तोतया पीएसआयने जिल्हा शस्त्रागारातून आपण  पीएसआय असल्याचे सांगत बनावट कागदपत्रांच्या आधारावर पिस्तूल व ३५ काडतुसे लंपास केली आहेत. पोलीस उपअधीक्षक (गृह) गिरीष ताथोड यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूक काळात २८ एप्रिल २०१४ रोजी शिवाजीनगर (खामगाव) येथील पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून राजेश व्ही.सरपोतदार या कथित नावाच्या व्यक्तीने पिस्तूल व काडतुसांच्या मागणीसाठी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक (गृह) यांचा शेरा असलेला अर्ज देऊन बुलढाणा पोलीस मुख्यालयातील जिल्हा शस्त्रागारातून नऊ मिमीची एक पिस्तूल व ३५ जीवंत काडतुसे घेऊन गेला.

काही काळानंतर संबंधित पिस्तूल व काडतुसे पोलीस विभागाच्या जिल्हा शस्त्रागारात जमा झाली नाही. तेव्हा शिवाजीनगर (खामगाव) पोलिस स्टेशनमध्ये कथित पोलीस उपनिरीक्षक राजेश व्ही.सरपोतदार बाबत विचारणा केली. तेव्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये व   जिल्ह्यातील अन्य पोलीस स्टेशनमध्येही या नावाचा कुणीही उपनिरीक्षक नसल्याचे सांगितले.

PSI : आठ वर्षानंतर गुन्हा दाखल

लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी बाहेरील जिल्ह्यातून 'त्या' नावाचा कुणी पोलीस उपनिरीक्षक आला होता काय? याबाबत चौकशी करण्यात आली असता त्यातून काही निष्पन्न झाले नव्हते. पिस्तूल व काडतुसे देण्याबाबत तोतया उपनिरीक्षकाने तत्कालीन पोलिस उपअधीक्षक (गृह) यांची बनावट स्वाक्षरी व शेरा दर्शविल्याचे तपासात समोर आले. अखेर 'त्या' तोतया पोलीस उपनिरीक्षकावर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये १२ आक्टोबर रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआय निलेश लोधी या प्रकरणातचा तपास करीत आहेत.

पोलीस प्रशासनाचा गलथानपणा

कुणी भामटा पोलिसांच्या शस्त्रागारापर्यंत पोहोचतो आणि धूळफेक करुन बिनदिक्कतपणे पिस्तूल (अग्नीशस्त्र) लंपास करतो. या प्रकरणातून, शिस्तबद्ध म्हटल्या जाणा-या पोलीस प्रशासनातील गलथानपणाच उघड झाला आहे. गंभीर प्रकरण असूनही गुन्हा दाखल व्हायला आठवे वर्ष उजाडावे हे ही एक गुढचं समजले जात आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news