दिवाळी विशेष : फक्त १ रुपयातही घेता येते डिजिटल सोने - Digital Goldची संपूर्ण माहिती | पुढारी

दिवाळी विशेष : फक्त १ रुपयातही घेता येते डिजिटल सोने - Digital Goldची संपूर्ण माहिती

दिवाळी विशेष : फक्त १ रुपयातही घेता येते डिजिटल सोने

पुढारी ऑनलाईन – दिवाळी आणि धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. सुबत्ता आणि आरोग्य यासाठी या शुभ दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. लक्ष्मी आणि कुबेर या देवतांचा आशीर्वाद मिळावा यासाठी नव्याने खरेदी केलेले सोने पूजाविधीत वापरले जाते. पारंपरिक पद्धतीने सोने घ्यायचे झाले तर दागिने, सोन्याची नाणी, बुलियन अशा स्वरूपात घ्यावी लागतात. पण डिजिटल पद्धतीनेही सोने खरेदी करता येते. (digital gold the unknown facts)

अशा प्रकारे सोने खरेदी करण्याचे बरेच फायदे आहेत. विशेष म्हणजे कमीत कमी किती सोने डिजिटल पद्धतीने घ्यावे, यावर मर्यादा नाही. त्यामुळे काही प्लॅटफॉर्मवर अगदी १ रुपयात ही डिजिटल सोने घेता येते. तर जास्तीजास्त किती सोने घ्यावे, यालाही मर्यादा नसली तरी एका दिवसात फक्त २ लाखापर्यंतची खरेदी करता येते. शिवाय आपण जेव्हा डिजिटल सोने घेतो तेव्हा ते २४ कॅरेटचे असते.

डिजिटल सोने घेण्याचे काही फायदे –

१. सुरक्षितता – डिजिटल सोने हे हॉल्टमध्ये सुरक्षित राहाते. आपण हे सोने वस्तू रूपात घेतलेले नसल्याने सुरक्षेची चिंता करावी लागत नाही.

२. खरेदीवर मर्यादा नाही – सोने खरेदी ही महागडी बाब असते. वस्तू रूपात सोने घ्यायचे असेल तर किमान ते काही ग्रॅममध्ये घ्यावे लागते. पण डिजिटल स्वरूपातील सोने अगदी १ रुपायातही घेता येते.

३. तरलता – डिजिटल सोने अगदी तरल असते. तुम्हाला जेव्हा विक्री करायचे असते तेव्हा अगदी पटकन बाजारभावानुसार विक्री करता येते.

४. वस्तूरूपातही बदलता येते – तुम्ही घेतलेले सोने जर कॉईन, बुलियन, दागिने अशा स्वरूपात बदलून हवे असेल तर ती सुविधाही मिळते. यासाठी पॅकेजिंग आणि डिलिव्हरी, तसेच तत्सम कर भरावे लागतात.

५. शुद्धता – सोने खरेदी करताना सोन्याची शुद्धता हा काळजीचा विषय असतो आणि फसवणुकीची शक्यता असते. पण डिजिटल सोने हे १०० टक्के २४ कॅरेटचे असते, त्यात फसवणुकीला जागा राहात नाही.

६. डिजिटल सोने खरेदी करण्याचे काही प्लॅटफॉर्म – Airtel Payment Bank, Paytm, HDFC Securities, G-Pay अशा विविध प्लॅटफॉर्मवर डिजिटल सोने खरेदी करता येते. Augmont Gold Ltd, MMTC-PAMP India Pvt आणि Digital Gold India Pvt/ Ltd या कंपन्या डिजिटल गोल्डचे व्यवहार करतात. त्यांनी विविध पेमेंट प्लॅटफॉर्मसोबत टायअप केलेले आहेत.

हेही वाचा

Back to top button