माहितीनुसार, नाशिक येथील मिरची चौकात शनिवारी (दि. 8) पहाटे लक्झरी बस आणि ट्रक अपघातात (Nashik bus accident) होरपळून १२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या गाडीतून लक्ष्मण राऊतही प्रवास करणार होते. वाशीम जिल्हा जात पडताळणी कार्यालयात लक्ष्मण राऊत हे अधिक्षक आहेत. त्यांनी त्यांचे सहकारी जात पडताळणी दक्षत समितीचे पोलीस उपअधिक्षक सुहास सातर्डेकर यांना चिंतामणी ट्रव्हल्सचे वाशिम ते नाशिक टिकीट काढण्यास सांगितले होते. तिकीट शनिवार ७ ऑक्टोबर रोजीचे सायंकाळी ७.३० वाजताचे सांगितले होते. पण सातर्डेकर यांच्याकडून गडबडीत ७ ऑक्टोबर ऐवजी ९ ऑक्टोबरचे तिकीट काढण्यात आले. त्यांनी तिकीटची शहानिशा न करता सदर तिकीट राऊत यांच्या व्हॉटसॲपर पाठवून दिले.
त्यांनीही तिकीट न पाहता थेट सायंकाळी चिंतामणी ट्रव्हल्सचे अकोला नाका येथील कार्यालय गाठले. वेळेत गाडीही दाखल झाली. राऊत यांनी गाडीत चढण्याचा प्रयत्न केला असता गाडीतील व्यक्तीने त्यांना हटकून तिकीट विचारले. संबधित व्यक्तीने तिकीट पाहून तुमचे तिकीट आजचे नसून ९ नोव्हेंबर रोजीचे असल्याचे सांगून गाडीत जागा नसल्याने तुम्ही बसू शकत नाही. असे उत्तर दिले. हे ऐकून राऊत यांचा पारा गरम झाला. थोडावेळ बाचाबाचीही झाली. अखेत तुम्ही ड्रायव्हरच्या बाजुला बसू शकता. असे राऊत यांना सांगण्यात आले. परंतू राऊत यांनी त्यास नकार देत रागारागाने घरी निघून गेले. ज्यांना तिकीट काढायला सांगितले त्यांच्यावर देखील ते चांगलेच रागावले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच नाशिक जवळ चिंतामनी ट्रव्हल्सच्या झालेल्या अपघाताची माहिती मिळतातच राऊत गहीवरुन गेले. अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविषयी विचारणा केली असता राऊत यांचे डोळे भरुन आले. आपण ज्या व्यक्तीला तिकीट काढायला सांगीतले त्यांना फोन करुन भेट घेतली आणि मला तुमच्यामुळे जीवनदान मिळाल्याबददल कृतज्ञता व्यक्त केली. त्या अनुषंगाने काळ आला होता पण वेळ आलो नव्हती ही परिचिती राऊत यांच्या विषयी घडली.
हेही वाचलंत का?