navratri : दुसऱ्या माळेला माहूरगडावर भाविकांची अलोट गर्दी | पुढारी

navratri : दुसऱ्या माळेला माहूरगडावर भाविकांची अलोट गर्दी

श्रीक्षेत्र माहूर; अपील बेलखोडे : महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक श्री. रेणुका देवीला मंगळवारी (दि.२७ सप्टेंबर) रोजी हिरव्या रंगाची साडीत पूजा बांधण्यात आली. दुसऱ्या माळेच्या पूजा विधी चंद्रकांत भोपी, चंद्रकांत रिठ्ठे, विनायक फांदाडे, दुर्गादास भोपी व बालाजी जगत यांनी केले.

यावेळी विश्वस्त संजय काण्णव, आशिष जोशी व अरविंद देव यांची उपस्थिती होती. गेली दोन वर्षे कोरोनामुळे शासनाने मंदिर बंद करण्याचे आदेश दिल्याने नवरात्र उत्सव भाविकाविना संपन्न झाला होता. यावर्षी मात्र, निर्बंध पूर्णपणे हटवल्याने मंगळवारी सकाळपासून माहूरगडावर भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. दुसऱ्या माळेस मंगळवारी सकाळी पहाटे ५ वाजता मंदिर उघडल्यापासून भाविकांनी मातेच्या दर्शनासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही दर्शन रांग रोडपर्यंत पसरली होती.

यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा माहूर गडावर ठेवण्यात आला होता. याच दरम्यान प्रचंड गर्दी झाल्याने प्रशासनाने काही काळासाठी गडावर बसेस पाठविण्याचे थांबविले होते.

हेही वाचलंत का? 

नवरात्र उत्सव काळात दिवसेंदिवस भाविकांच्या गर्दीत वाढ होत असल्याने व्यवस्थापन समितीने परिस्थितीनुरूप मंदिराचा वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
-योगेश साबळे (कार्यालयीन व्यवस्थापक )

Back to top button