

उमरखेड; पुढारी वृत्तसेवा : उमरखेड शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून एका चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली चमत्कार करून आजार बरे करण्याचा बनावट प्रकार रविवारी उघडकीस आला. याप्रकरणी दत्ता परसराम लांबटिळे (वय २८, रा. साठेनगर गिरगांव, ता. वसमत जि. हिंगोली) याला भगतसिंग वार्ड येथून पोलिसांनी अटक केली. याबाबतची फिर्याद देवानंद इंगोले यांनी दिली आहे.
अधिक माहिती अशी की, दत्ता लांबटिळे हा शहरातील भगतसिंग वॉर्डमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ख्रिचन धर्माचे व चमत्कार करून रूग्णांना बरे करण्याचे काम करीत होता. याबाबतची माहिती येथील देवानंद इंगोले यांना मिळाली. त्यांनी त्यांचा मित्र अतुल खंदारे याला रुग्ण बनवून दत्ता यांच्याकडे घेवून गेले. तेव्हा तिथे सुमारे शंभरहून अधिक महिला व पुरुषांच्या डोक्यावर हात ठेवायचा व त्यांना एक द्रव्य हातावर देऊन वास घेण्यास सांगत होता. देवानंद यांनी दत्ता याला आजारी असल्याचे सांगितल्यानंतर त्याच्याही हातावर द्रव्य देवून वास घेण्यास सांगितले. त्यानंतर तू आता बरे झाला आहेस, तुला कोणत्याही दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही असे सांगितले. यावर देवानंत यांनी चमत्कार किंवा अलौकिक शक्ती नसल्याचे म्हणताच दत्ता याने त्यांना मारहाण केली. देवी देवतांबाबत वाईट बोलून धार्मिक भावना दुखावल्याची फिर्याद देवानंद इंगोले यांनी दिली असून दत्ता लांबटिळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यामध्ये एका चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जनतेला विविध प्रकारची आमिषे दाखवून धर्म परिवर्तन करण्याचा प्रकार घडत आहेत. प्रचार व प्रसार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचे धर्म विरोधी कारवाया खपवून घेणार नाही.
– आमदार नामदेव ससाने
हेही वाचा :