शिंदे-फडणवीस सरकारची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची हिंमत नाही : वरुण सरदेसाई | पुढारी

शिंदे-फडणवीस सरकारची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची हिंमत नाही : वरुण सरदेसाई

गेवराई (बीड), पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेशी गद्दारी करून, बंडखोरांनी भाजप सोबत घरोबा करत राज्यात सत्ता स्थापन केली. परंतु त्यांचे सामान्य नागरिक आणि विकासाकडे लक्ष नाही. त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास उडालेला आहे. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठल्याही निवडणुका घेण्याची त्यांची हिंमत होत नाही, असे मत शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केले. अआज  (दि. 17) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त गेवराई येथे युवा सैनिकांचा निर्धार मेळाव्‍यात ते बाेलत हाेते.

गेल्या विधानसभा निवडणुकीतच बदामराव पंडित यांना गेवराई विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे चिन्ह आणि उमेदवारी मिळाली असती तर ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असते, याची जाणीव आम्हाला आहे. यावेळी मात्र राज्यातल्या शिवसेनेच्या पहिल्या 10 उमेदवारी मध्ये बदामराव पंडित यांची गेवराई मतदार संघातली उमेदवारी असणार आहे, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील कार्य आणि नेतृत्वावर राज्यातल्या जनतेने मनातून समाधान व्यक्त केले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत शिवसेनेने आघाडी केली हे शिवसैनिकांसह जनतेला आवडले नाही. याचाच परिणाम शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केली. असे असले तरी या पुढच्या काळात शिवसेनेने युती तोडून राज्यातल्या 288 जागांवर स्वतंत्र विधानसभेची निवडणूक लढल्यास, राज्यात सर्वाधिक आमदार हे शिवसेनेचेच निवडून येतील असा विश्वास माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी यावेळी  व्यक्त केला.

हेही वाचा  

Back to top button