कोल्हापूर : आसुर्ले येथील एकावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल | पुढारी

कोल्हापूर : आसुर्ले येथील एकावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून व टेम्पो चालकाला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी एकावर पन्हाळा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबासाहेब गणपती पाटील (रा.आसुर्ले, ता. पन्हाळा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सुमन विलसन रणभिसे (वय ३२, रा. पोर्ले, ता. पन्हाळा) या राजू दिनकर चावरेकर (रा.पोर्ले) यांच्या टेम्पोतून कामावर जात होत्‍या. यावेळी अन्य महिलांना घेण्यासाठी टेम्पो आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे थांबला. यावेळी बाबासाहेब पाटील यांने टेम्पो का थांबविला ? असा जाब विचारत टेम्पो चालक राजू याला मारहाण करु लागला. यावेळी फिर्यादी सुमन यांनी बाबासाहेब यास अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बाबासाहेब पाटील याने   सुमन यांना जातिवाचक शिवीगाळ करत टेम्पो चालक राजु याला मारहाण करून जखमी केले.

याप्रकरणी बाबासाहेब पाटील याला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास शाहूवाडी उपविभागीय अधिकारी रवींद्र साळोखे करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button